Ad will apear here
Next
पानिपत चित्रपटातील दागिन्यांचे प्रदर्शन
‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ने घडवले दागिने

पुणे : मराठा साम्राज्यासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर बनविण्यात आलेल्या पानिपत चित्रपटासाठी दागिने घडविण्याचा मान पु. ना. गाडगीळ आणि सन्सला मिळाला आहे. या चित्रपटात वापरण्यात आलेले पारंपरिक शैलीचे दागिने पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे औंध, हॅपी कॉलनी आणि सातारा रोड येथील दालनांमध्ये या दागिन्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.  


पहिले प्रदर्शन औंधमधील वेस्टएंड सेंटर वनमधील रिलायन्स मार्टशेजारील पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या दालनात १९ नोव्हेंबर ते एक डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८.३० दरम्यान सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. कोथरूडमधील हॅपी कॉलनी येथील दालनात २६ नोव्हेंबर ते आठ डिसेंबर आणि सातारा रोड (वाळवेकरनगर) येथील दालनात चार डिसेंबर ते २२ डिसेंबरदरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.


या प्रदर्शनाबाबत पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे संचालक व अध्यक्ष अजित गाडगीळ म्हणाले, ‘चित्रपटाचे दागिने हे महाराष्ट्रीय शैलीबरोबरच उत्तरेकडील शैलीतील असून, दागिन्यांसाठी विशेष संशोधन केले आहे. हे दागिने विविध राज्यांतील आमच्या कारागीरांनी घडविले आहेत. सोन्याबरोबर कुंदन, मोती आणि विविध रंगांच्या स्टोन्सचा वापर दागिन्यांत आहे.’    
  

‘पारंपरिक मराठा व पेशवाई शैलीचे उत्तम कलाकुसरीचे दागिने घडविण्यात पु. ना. गाडगीळ आणि सन्सचा हातखंडा असल्याने आम्ही ‘पानिपत’साठी पु. ना. गाडगीळ आणि सन्सची निवड केली,’ असे ट्विट या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी केले होते.    

दागिन्यांबाबत पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे सीएफओ व विक्रीप्रमुख आदित्य मोडक म्हणाले, ‘चित्रपटासाठी आठशेहून अधिक प्रकारचे दागिने घडविले असून, यात नेकलेस, बांगड्या, डोक्यातली फुले, कडे, अंगठ्या, कंबरपट्टे, शिरपेच, वाक्या, आदींचा समावेश आहेत. प्रदर्शनातील दागिन्यांवरून खरेदीसाठी ऑर्डरही देता येईल.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZTRCG
Similar Posts
‘पानिपत’च्या कलाकारांनी पाहिले चित्रपटासाठी घडविलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन पुणे : बहुचर्चित पानिपत या ऐतिहासिक चित्रपटासाठी पुण्यातील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ने आठशेपेक्षा जास्त प्रकारचे दागिने घडवले आहेत. या चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतीच पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या औंध येथील दालनाला भेट दिली. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता अर्जुन कपूर, कृति सेनन आणि सुनीता गोवारीकर यांचा समावेश होता
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
कलाकार घडण्यासाठी हवा प्रत्यक्ष अनुभवच; तंत्रज्ञानाचा वापर कलात्मकता मारण्यासाठी नको पुणे : ‘हल्ली इंटरनेटवर कोणता विषय मिळत नाही असे नाही. त्यामुळे मुलांना एखादा विषय सांगितला की पालक लगेच मोबाइल, इंटरनेट वापरतात; मात्र कोणताही कलाकार घडायचा, घडवायचा असेल, तर मुलांना प्रत्यक्ष अनुभवच देणे आवश्यक असते. स्वतःच्या कल्पकतेने, सर्जनशीलतेतून आणि निरागसतेतून साकारलेली कलाच दीर्घ काळ टिकाव धरू शकते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language